|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुधाची मलई स्वतःच चाखाल तेव्हाच सधन बनाल

दुधाची मलई स्वतःच चाखाल तेव्हाच सधन बनाल 

उचगाव / वार्ताहर

शेतकरी काबाडकष्ट करून जनावरांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेऊन दुधाचे उत्पादन घेतो. मात्र त्या दुधाची मलई भलताच खातो. हे तंत्र बदलायचे असेल तर शेतकरी चाणाक्ष बनला पाहिजे. स्वतः उत्पादन केलेल्या दुधाची स्वतःच मार्केटमध्ये विक्री केली पाहिजे. दूध संघ, कमिशन एजंट यांना फाटा देऊन दुसऱयाला मलई न कृषी अभियानाची माहिती दिली. यावेळी साहाय् कृषी अधिकारी पी. एस. ज्योती (उचगाव), सी .एस. नायक (बेळगुंदी), पी. एस. पांढरे (किणये), रहीम सरीफ (कुदेमनी) यांन् कृषी मेळावा तसेच कृषी वस्तू प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली.

 कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालक एन. ओ. चौगुले यांनी करून आभार मानले.

 कृषी वस्तू प्रदर्शनामध्ये भूमी ऍग्रो एजन्सीच्या व्ही.एस.टी. शक्ती ट्रक्टर, अजित खेमलापुरे, पावशे व पाटील कंपनीचे सेंद्रीय सोना गांडूळ खत, रमाकांत पावशे, चंद्रप्रभू पाटील, हार्टिकल्चर खात्यामार्फत जैविक खते, भारत इम्फेक्ट कंपनीमार्फत चक्की, पिठाच्या गिरण्या अशा अनेक स्टॉलमार्फत शेतकऱयांना माहिती देण्यात येत होती. कृषी अभियानमध्ये माजी ग्रा. पं. सदस्य नीळकंठ कुरबूर मलाप्पा कोवाडकर, वैजनाथ गोजगेकर यांनी शेती, कृषी वस्तू याबाबत माहिती विचारली.

प्रत्येक ग्रा. पं. ना  कृषी सेवा मिळावी

ग्रा. पं. सदस्या गंगा पाटील यांनी उचगाव् कृषी रयत केंद्रामध्ये इंद्रायणी भात बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर बेनकनहळ्ळी येथील नारायण पाटील यांनी प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयामध्ये  कृषी सेवा व पशुवैद्यकीय सेवा मिळावी अशी मागणी केली.

Related posts: