|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » leadingnews » हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद चकमकीत ठार

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद चकमकीत ठार 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

काश्मीर खोऱयात सुरु असलेल्या भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

जम्मू-काश्मीरातील त्राल येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादरम्यान सबजार अहमद याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. सबजार अहमद याने काश्मीर खोऱयात बुरहान वानीची जागा घेतली होती. सुरक्षा पथकांनी चकमक सुरु असलेल्या भागामध्ये घेराव घातला. त्यावेळी तो एका घरामध्ये अडकल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरातील काही भागात सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली होती. सोशल मीडियावरील ही बंदी आज उठवण्यात आली.