|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Automobiles » Jaguar XE पेट्रोल वेरियंटच्या किमतीत कपात

Jaguar XE पेट्रोल वेरियंटच्या किमतीत कपात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जॅग्वार लँड रोव्हरने एक्सई सेडानच्या पेट्रोल वेरियंट मॉडेलच्या किमतीत कपात केली आहे. जॅग्वार लँड रोव्हरने आपल्या नव्या पेट्रोल वर्जन किमतीत 2 लाख 65 हजारांची कपात केली आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 2.0 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या माध्यमातून 200 पीएस पॉवर आणि 320 एनएमचा टार्क निर्माण करता येणार आहे.

– गिअरबॉक्स – 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले असून, याच्या माध्यमातून पुढील चाकांना पॉवर सप्लाय केला जाऊ शकतो.

– स्पीड – 0 ते 100 किमी प्रतितासच्या वेगाने 7.7 सेकंदाचा कालावधी लागेल.

– टॉप स्पीड – 237 किमी-प्रतितास