|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ती जाते आणिक येते

ती जाते आणिक येते 

सकाळचे अकरा वाजले होते. अचानक वीज गेली. प्रत्येक खोलीतला डोक्मयावरचा गरगरणारा पंखा हळूहळू मंद होत थांबला.
आतल्या खोलीत बीपीची गोळी घेऊन निजलेल्या सासूबाईनी कूस बदलली आणि परमेश्वरा… म्हणून एक क्षीण हाक मारली. मग उठून बसून घाम पुसला आणि तिथेच चुळबूळ करीत राहिल्या. कानाचे यंत्र काढून बाल्कनीत हवा खात पेपरमधले शब्दकोडे सोडवीत बसलेल्या सासरेबुवांना वीज गेल्याचे समजलेच नाही.
स्वयंपाक घरातला फ्रिज गुणगुणत होता. तो शांत झाला. खोलीतली गरम हवा बाहेर फेकणारा एक्झास्ट पंखा बंद झाला. स्वयंपाकात मग्न गृहिणीने डाव्या मनगटाने कपाळावरचा घाम पुसत खिन्न उद्गार काढले, “गेली का वीज? अरे देवा, आता चार तास…’’ मग तिने बाहेर येऊन टेबलवरचा फोन उचलला आणि समोरच्या कॅलेंडरवर लिहिलेला नंबर गिरवीत वीज मंडळाकडे एक निष्फळ तक्रार नोंदवायला सुरुवात केली.
हातात मोबाईल घेऊन सोफ्यावर लोळणाऱया फेसबुकमग्न युवराजांनी चमकून थांबलेल्या पंख्याकडे पाहिले आणि सरकारच्या नावाने एक संतप्त उद्गार काढला. मग तोच फेसबुकवर लिहून पोस्ट केला. त्यावर लगेच प्रतिसाद येऊ लागले. प्रतिसाद अगदी अपेक्षित असेच होते.
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जवान लढत आहेत. तुम्ही थोडा वेळ भारनियमन देखील सहन करू शकत नाही का? भारनियमनाबद्दल तक्रार करणारे देशद्रोही आहेत. त्यांना फाशी दिले पाहिजे.
गेली सत्तर वर्षे भारनियमन कधीच झाले नव्हते का? मग आजच तक्रार का करता? सत्तर वर्षातली घाण काढायला आम्हाला थोडा वेळ लागेल.
सत्तर वर्षांचे तुणतुणे किती वर्षे वाजवणार? सत्तर वर्षे काय एकाच पक्षाची सत्ता होती का? 1947 ते 1952 सर्वपक्षीय सरकार होते. 1977 ते 1980 जनता पक्ष आणि लोकदल, 1989 साली जनता दल, 1990 साली समाजवादी जनता पार्टी, 1996 ते 1997 भाजप आणि नंतर जनता दल, 1998 ते 2004 भाजपची सत्ता होती.
भारनियमन नष्ट व्हावे म्हणून काही आम्ही हे सरकार निवडले नव्हते.
अशी धुमश्चक्री चालू असताना युवराजांच्या मोबाईलची बॅटरी संपली. चरफडत उठून त्यांनी कपडे बदलले. एखादा सिनेमा बघावा म्हणून ते घराबाहेर पडणार तेवढय़ात वीज आली. त्यांनी आनंदाने फोन चार्जिंगला लावला आणि टीव्हीसमोर विराजमान झाले.

Related posts: