|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगडमधील ‘त्या’ हॉटेलच्या व्यवस्थापकावर गुन्हा

देवगडमधील ‘त्या’ हॉटेलच्या व्यवस्थापकावर गुन्हा 

वार्ताहर/ देवगड

पर्यटनानिमित्त देवगड येथील एका हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी राहिलेल्या पुणे येथील निकम कुटुंबातील कु. सई हेमंत निकम या पाचवर्षीय मुलीचा हॉटेलच्या दुसऱया मजल्यावरून लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या पोकळीमध्ये पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सईचे वडील हेमंत अशोक निकम (रा. गोकुळनगर, कात्रज-पुणे) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून हॉटेलचे व्यवस्थापक रुपेश बांदेलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 4 मे रोजी दुपारी 3.15 वा. च्या सुमारास घडली होती. हॉटेलची इमारत ग्राहकांसाठी सुसज्ज व सुरक्षित नसताना व्यवस्थापक बांदेलकर याने निकम यांना रुमची बुकिंग दिली. त्यामुळे सईच्या मृत्यूस बांदेलकर याचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निकम यांनी कोल्हापूर-राजारामपुरी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण तपासासाठी देवगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून हॉटेल व्यवस्थापक रुपेश बांदेलकर याच्याविरुद्ध भादंवि कलम 304 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related posts: