|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » ‘फोर्ड’कडून 30 हजारापर्यंत डिस्काऊंट

‘फोर्ड’कडून 30 हजारापर्यंत डिस्काऊंट 

जीएसटी लागू होण्यापूर्वी इकोस्पोर्ट्स, फिगो, अस्पायरवर सवलत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फोर्ड इंडिया या अमेरिकन कार कंपनीने निवडक मॉडेल्सवर 30 हजारापर्यंत डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. 1 जूलैपासून लागू होणाऱया जीएसटीअंतर्गत ही सूट देण्यात येईल. इकोस्पोर्ट्स या एसयुव्ही, अस्पायर सेडान आणि हॅचबॅक प्रकारातील फिगो या कारवर 30 हजारापर्यंत डिस्काऊंट देण्यात येईल.

इकोस्पोर्ट्स मॉडेलवर 20 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येईल. दिल्लीतील एक्सशोरुममध्ये या कारची किंमत 7.18 लाख ते 10.76 लाख रुपयांदरम्यान आहे. फिगो आणि अस्पायर या मॉडेल्सवर 10 हजार ते 25 हजारापर्यंत सवलत देण्यात येईल. दिल्लीमध्ये फिगोची किंमत 4.75 लाख ते 7.73 लाख आणि अस्पायर 5.44 लाख ते 8.28 लाख रुपयांदरम्यान आहे.

जीएसटी लवकरच लागू करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्षात नवीन करप्रणालीचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे फोर्ड इंडियाच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष विनय रैना यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात ऑडी या जर्मन लक्झरी कार कंपनीने 30 जूनपर्यंत 10 लाख रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली होती. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेन्झ या कंपन्यांनीही निवडक कारवर जीएसटीनिमित्त सूट जारी केली आहे.