|Friday, January 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीआयएससीईच्या 12 वीत कोलकाताची अनन्या प्रथम

सीआयएससीईच्या 12 वीत कोलकाताची अनन्या प्रथम 

नवी दिल्ली

 कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) सोमवारी आयसीएसई (10वी) आणि आयएससी (12वी) चा निकाल जाहीर केला. 10 वी आणि 12 वी दोन्ही ठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे. 12 वीच्या परिक्षेत कोलकाताची अनन्या मायती 99.5 टक्के गुणांसह पहिली आली आहे. तर 10 वीच्या परिक्षेत पुण्याची मुस्कान अब्दुल्ला आणि बेंगळूरचा अश्विन राव यांनी 99.4 टक्के गुणांसह संयुक्तरित्या पहिला क्रमांक मिळविला आहे. अनन्या कोलकाताच्या हेरिटेज शाळेची विद्यार्थिनी असून तिने 99.5 टक्के गुण मिळविले आहेत. 4 विद्यार्थ्यांनी समान गुण मिळविले दुसरे स्थान मिळविले आहे. या सर्वांना 99.25 टक्के गुण मिळाले. आयुष श्रीवास्तव, देवेश लखोटिया, रिषिता धारीवाल आणि के. श्रीकांत अशी त्यांची नावे आहेत. तिसऱया क्रमांकावरील विद्यार्थ्यांनी 99 टक्के गुण मिळविले आहेत.

Related posts: