|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गडहिंग्लजला फणसाची आवक सुरू

गडहिंग्लजला फणसाची आवक सुरू 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात फणसाची आवक होण्यास सुरवात झाली असुन कापा फणसाची किंमत 60-80 रुपये प्रती नग इतकी आहे. वळीव पावसाच्या विंश्रातीनंतर गडहिंग्लज आठवडा बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

पावसाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे सर्वत्र खरिप हंगामाची तयारी होत असल्याने त्याचा परिणाम आठवडा बाजारपेठेते दिसून आला. पण बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरावले असल्याचे पहावयास मिळाले. टोमॅटो 30 रूपये प्रती किलो, सिमला मिरची 40-60 रूपये प्रती किलो, कोबी 20 रूपये प्रती नग, दोडका 20 रुपये प्रती किलो, कोथिंबिर 20 रूपये प्रती पेंडी असे दर झाले होते. पालेभाज्याची आवकही कमी प्रमाणात झाल्याचे आठवडा बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.