|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरा

उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरा 

कराड

पाटण तालुक्यातील गोरगरीब रूग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱया कराडच्या सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे  तातडीने भरण्याची मागणी भिमशक्ती सामाजीक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

याबाबत भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शासनाच्या माध्यमातुन कोटय़वधी रूपयांचा निधी खर्चून कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र येथील तज्ञ डॉक्टरांच्या जवळपास सर्वच जागा रिक्त असल्याने रूग्णांना खासगी रूग्णांलयात जावे लागत आहे. सिटी स्कॅन व  सोनोग्राफीचे मशीन धुळखात पडले आहे. ही मशीन सुरू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related posts: