|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

बुध. दि. 31 मे ते 6 जून 2017

माणसे जोडण्यास शिका भाग-2

आज जगात सर्वत्र अनाचार भांडणतंटे पोलीसप्रकरणे शत्रुत्व भाषिक वाद निदर्शने कोर्टप्रकरणे कौटुंबिक धुसफूस गुप्तशत्रुत्व एकमेकांच्या उखाळय़ा पाखाळय़ा काढणे पाठीमागून निंदानालस्ती  करणे एखाद्याविषयी गैरसमज पसरविणे असे प्रकार सतत चालू असलेले दिसतात. माणसांनी जर माणसे जोडण्याचा प्रयत्न केल्यास जगात सर्वत्र सुखसमाधान राहाल. पण तसे होत नाही हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. माणसे कशी जोडावीत व त्याचा फायदा कसा होतो हे पहिल्या भागात स्पष्ट केलेले आहे. त्यातील मुद्दे आवडल्याचे अनेकांनी कळविले आहे. जगात कोण कोण कुणाला केव्हा कोणत्यावेळी उपयोगी पडेल हे जसे सांगता येणार नाही तसेच कुणाच्या मनात केव्हा शत्रुभावना निर्माण होईल व तो जिवावर उठेल हे देखील कळणे कठीण आहे. त्यासाठीच प्रत्येकाने आपापल्या परीने माणसे जोडण्याचा प्रयत्न करावा. त्याचा कुठे तरी कधीतरी निश्चितच फायदा होईल. फक्त गोड बोलूनच माणसे जोडली जातील असे नसते. आपली कृती देखील तशी हवी. गरीब श्रीमंत, लहान थोर, अपंग, शारीरिक व्यंग, एखाद्याचे कपडे अथवा त्याचे, बोलणे, वागणे, तसेच त्याची परिस्थिती नोकरी याबाबत त्याची चेष्टामस्करी करू नका. अथवा त्याला टोमणे मारून बोलू नका. प्रत्येकाला तीच परिस्थिती रहात नसतो. हाती चार पैसे आले. घर, बंगला झाला. अथवा आपली मुले शिक्षणात अथवा नोकरीत वर आली की काहीजण हवेत तरंगु लागतात व इतरांची हेटाळणी करण्यास सुरुवात करतात त्यांना टोचून बोलतात अपमान करतात पण सर्वांना तीचवळ राहात नसते. निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही. अथवा परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. आज सायकलने फिरणारा भविष्यकाळात विमानाने फिरू शकेल व राजऐश्वर्यात श्रीमंतीत लोळणारा रस्त्यावर  अनवाणी चालताना व याचना करतानाही दिसू शकेल. यासाठीच कुणाच्या परिस्थितीवर हसू नका. अथवा त्याला टोचून बोलू नका यालाच ज्योतिषशास्त्रात शुभाशुभ ग्रहयोग दशा असे म्हणतात. दशा चांगली आणायची की वाईट ते आपण ठरवायचे असते. कुणाचे शाप कसे बाधतील सांगता येणार नाही. आपले शिक्षण कोणतेही असो ज्यातून आपले पोट भरते त्याला परमेश्वर मानावे प्रत्येकाचे नशिब वेगळे असते कोण कुठल्या मार्गाने पैसा कमवून श्रीमंत झालेला असतो हे लोकांना माहीत नसले तरी आपल्या मनाला ते नक्कीच माहीत असते व अंतर्मन हाच साक्षात परमेश्वर असल्याने आपण इतराविषयी जो चांगला वाईट विचार करीत असतो याचे परिणाम बुमऱयांगप्रमाणे आपल्यावर उलटतात व ग्रहदशा फिरली की त्याचे फटके बसण्यास सुरुवात होते आपल्या धर्मात स्त्रीला आदिशक्ती मानलेली आहे. त्यामुळे स्त्री शाप हा फार वाईट मानलेला असून 40-42 पिढय़ापर्यंत म्हणजेच कित्येक हजारो वर्षापर्यंत हा शाप जात नाही. यासाठी कोणत्याही मुलीला अथवा स्त्राrला तिच्या कामाविषयी अथवा तिच्या परिस्थितीविषयी चुकूनही वाईट बोलू नका प्रत्येकाच्या जिभेला शक्ती असते कुणाची  जीभ केव्हा कुणाचा उद्धार करील अथवा रसातळाला पोचवील हे सांगता येणार नाही. यासाठी माणसे जोडण्यास शिका तसेच श्रीमंती अथवा शिक्षणाचा बुद्धीचा गर्व करू नका. ज्यावेळी आपण इतरांना तुच्छ लेखतो टोचून बोलतो तीचवेळ आपली अधोगती सुरू होण्यास कारणीभूत ठरत असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.


मेष

तृतीयात आलेल्या मंगळामुळे आर्थिक बाबतीत आगामी दीड महिना उत्तम जाईल. न होणारी कामेही पूर्ण होतील. कर्तबगारीला वाव मिळेल. शनि, मंगळाचा प्रतियोग धैर्य व धाडस वाढविल. पण वाहन मात्र जपून चालवा. अपघाताची शक्मयता आहे. भावंडाशी मतभेद टाळा. इस्टेटीच्या बाबतीत वाटाघाटी करताना सावध राहणे चांगले. जे काम कराल ते यशस्वी होईल.


वृषभ

धनस्थानी मंगळ व त्याच्याशी होणारा शनिचा प्रतियोग खर्चात वाढ करील. सहजासहजी कोणत्याही कामात यश मिळेल या भ्रमात राहू नका. वडिलोपार्जित जमिन, शेतीवाडी व मालमत्ता असेल तर त्याचा लाभ होईल. डोळय़ांची खबरदारी घ्यावी लागेल. बोलण्यात कटुता येणार नाही. यासाठी जपा. मोबाईलवर बोलताना थट्टा मस्करी व टीका करू नका. अंगलट येण्याची शक्मयता आहे. चंद्र, शुक्र योग सर्व बाबतीत शुभ फळ देईल.


मिथुन

मंगळ लक्ष्मीयोगात आहे. त्यामुळे नोकरी उद्योग व्यवसायातून पैसा मिळत राहिल. सर्व तऱहेची व्यसने व प्रेमप्रकरणे यापासून दूर रहा. अन्यथा कोठेतरी स्टिंग ऑपरेशन होऊन कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतील. शनि, मंगळ प्रतियोग दुर्घटनादर्शक आहे. सर्व तऱहेच्या धोक्मयापासून सांभाळा. शुक्राचे भ्रमण मोठमोठय़ा मित्रमंडळीकडून काही तरी मोठा फायदा करून देईल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल.


कर्क

शुक्राचे भ्रमण ऐषाराम व विलासीवृत्ती वाढविल. सर्व कामात यश मिळवाल. राजवैभव देणारा योग. मंगळाचे भ्रमण कौटुंबिक जीवनात वादावादी निर्माण करील. रागावर नियंत्रण ठेवा. शनि, मंगळ प्रतियोगामुळे खर्च वाढतील. विवाहाची बोलणी आणि वाटाघाटी आगामी दीड महिन्यात शक्मयतो करू नका. काहीतरी घोटाळे निर्माण होण्याची शक्मयता.  कोणाला चेक वगैरे देताना जपून रहावे लागेल. व्यवहार करताना रोखेचे करावेत.


सिंह

भाग्यात आलेल्या शुक्रामुळे धार्मिक वृत्ती आणि विद्याव्यासंग वाढेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करा. तुमच्या पत्रिकेत जर योग असेल तर परदेश गमनाचे योगही येतील. जहाज बांधणी, रासायनिक कारखाने यात नोकरी मिळण्याचे योग. शनि, मंगळाचा प्रतियोग काही बाबतीत अतिशय शुभफलदायी आहेत तर काही अशुभ योगामुळे मुले बाळे व इतरांच्या व मित्रमैत्रिणीच्या चुकीमुळे वाहन अपघात व त्यामुळे आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्मयता.


कन्या

अष्टमातील शुक्रामुळे व्यवसायात आर्थिक फायदा होईल. शनि, मंगळ प्रतियोग चतुर्थ दशमातून होत आहे. नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल. काही घटना घडून नोकरी सोडण्याचा विचार कराल. शक्मयतो तुमची बाजू स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. पण कुलदीपक योग होत असल्याने सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. एखादे सत्तास्थान मिळण्याची दाट शक्मयता. सरकारी नोकरीत असलेल्यांनी जरा सावध राहणे चांगले.


तुळ

सप्तमातील शुक्र वैवाहिक जीवनात सुखसमाधान व आर्थिक समृद्धी आणेल. एखादे प्रेमप्रकरण असेल तर त्याचे विवाहात रुपांतर होईल. विवाह झाला असेल तर भाग्य उजळेल. पराक्रम व भाग्यस्थानातून होणारा शनि मंगळाचा प्रतियोग धर्मवेडेपणा निर्माण करील. त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणीने धार्मिक अतिरेकाकडे मन वळेल. नोकरी व्यवसायात कामाची  जबाबदारी वाढेल. त्या प्रमाणात बढतीचेही योग दिसतात. परदेश प्रवास अथवा अति लांबचे प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक

 नोकर चाकर चांगले व आज्ञाधारक मिळतील. मामा मावशी यांच्याकडून फायदा होण्याची शक्मयता. एखाद्या नातेवाईक व्यक्तिशी विवाह जुळण्याची शक्मयता. धन व अष्टमस्थानातून  होणारा शनि मंगळाचा प्रतियोग तीव्र अपघातदर्शक आहे. वाहन जपून चालवा. तसेच सर्व तऱहेच्या धोक्मयापासून सांभाळा. मानसिक तणाव वाढवू देऊ नका. आर्थिक बाबतीत काटकसरीने वागल्यास चांगले पण गुरुच्या आशीर्वादामुळे कोणतेही संकट आले तरी त्यातून निभावून जाल.


धनु

पंचमात आलेला शुक्र आराम, चैनीवृत्ती, तसेच हौशी वस्तुंची खरेदी व प्रेमप्रकरणे अशी फले देण्याची शक्मयता आहे. तरुण तरुणी प्रेमप्रकरणात फसगत  होणार नाही याची काळजी घ्यावी. चित्रपट क्षेत्र अथवा मोठय़ा शहरात नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुलींना जाळय़ात अडकविण्याचा प्रयत्न होईल. शनि, मंगळाचा प्रतियोग आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्यास सुचवित आहे. तसेच कोणत्याही व्यवहारात, बोलण्यातून कटुता येणार नाही याची काळजी घ्या.


मकर

राशिस्वामी शनिचा मंगळाशी होणारा प्रतियोग कष्ट व संघर्षातून मोठे यश देईल. पती पत्नींनी गैरसमजाला वाव देऊ नये. किरकोळ दुखापती व शस्त्रापासून इजा होऊ शकेल. शुक्र, हर्षलचे चतुर्थातील भ्रमण अत्यंत विचित्र आहे. जागेसंदर्भातील कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अचानक घडामोडी व भानगडी निर्माण होतील. जमिन जुमला आणि बागायत खरेदी होण्याची शक्मयता. डोळसबुद्धीने वागल्यास बरेच काही साध्य होईल.


कुंभ

शनि मंगळाचा प्रतियोग हटवादीपणा वाढवेल क्षुल्लक गोष्टीसाठी वादावादीचे प्रसंग येतील. प्रवास स्थानातून हा योग होत असल्याने सर्व तऱहेच्या दुर्घटनेपासून जपा. चंद्र, शुक्र, हर्षल या योगामुळे गायन, वादन, प्रकाशन, लेखन, फोटोग्राफी यात उत्तम यश मिळेल. तरुण तरुणींनी काही बाबतीत संयम बाळगणे आवश्यक कोणाशीही अति सलगी करू नका. मनमिळावूवृत्ती ठेवल्यास सर्व क्षेत्रात यश मिळवाल.


मीन

चतुर्थ दशमातून मंगळ शनिचा प्रतियोग होत आहे. नोकरी व्यवसायात जरा जपून रहावे लागेल. या आठवडय़ात शुक्राचे भ्रमण धनलाभाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. सतत कोठून ना कोठून पैसा येत राहील. पण उधळपट्टी व खर्च यावर नियंत्रण ठेवा. काही नव्या ओळखी होतील. व्यवसाय, उद्योग तसेच मंगलकार्य जुळण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.