|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » लवकरच एक रूपयाची नवी नोट येणार!

लवकरच एक रूपयाची नवी नोट येणार! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लवकरच एक रूपयाची नोट चलनात येणार असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेलया एक रूपायच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत.

नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयात नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल.तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे. याशिवाय, नोटेवर ‘एल’हे आक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.