|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » गरवारे वॉल रोप्सच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ

गरवारे वॉल रोप्सच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ 

प्रतिनिधी / पुणे

गरवारे-वॉल रोप्स लिमिटेड (जीडब्ल्यूआरएल) या भारतीय आणि जागतिक बाजारपेठेतील अग्रेसर तांत्रिक टेक्सटाइल्स उत्पादकांकडून 31 मार्च 2017 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2017 च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ विक्रीत 15 टक्क्यांची म्हणजेच 214.06 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 2016 च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ विक्रीचा आकडा हा 186.16 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2017 च्या चौथ्या तिमाहीत कराआधी नफ्यात 21 टक्क्यांची वाढ झाली असून, हा आकडा 29.34 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2016च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 24.25 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष 2017 च्या चौथ्या तिमाहीत करानंतर एकूण नफ्यात 13.6 टक्के म्हणजेच 19.64 कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे. हा आकडा आर्थिक वर्ष 2016च्या चौथ्या तिमाहीत 17.28 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष 2017च्या चौथ्या तिमाहीत इपीएस 8.97 रुपये झाले, आर्थिक वर्ष 2016च्या चौथ्या तिमाहीत 13.6 टक्के विकास झाला होता.