|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सरंबळमध्ये मृत माकड सापडले

सरंबळमध्ये मृत माकड सापडले 

कुडाळ : कुडाळ, नेरुर पाठोपाठ मंगळवारी दुपारी तालुक्यातील सरंबळ-बागवाडीमध्ये एका बागेत मृत माकड सापडले. मृत माकड सापडल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. के. मळीक यांनी शवविच्छेदन केले असून व्हिसेरा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, नेरुर येथील मृत माकडाचा अहवाल प्राप्त झाला असला, तरी तेथे सापडलेल्या गोचिडींचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सरंबळ येथे मृत माकडावर व परिसरात गोचिडी सापडल्या असून त्याही तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. कांबळे यांनी सांगितले.

बागवाडीमध्ये मृतावस्थेत माकड सापडल्याचे समजताच जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळचे सभापती राजन जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांच्यासह यंत्रणा तेथे पोहोचली. तात्काळ परिसरात डस्टींग (फवारणी) करण्यात आली. तसेच सरंबळ भागात सर्व्हे सुरू करण्यात आला. उद्या बुधवारीही सर्व्हे करून फवारणी करण्यात येईल. ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.

नेरुरमध्ये तापाचा रुग्ण सापडला नाही

नेरुरमध्ये मृत माकड सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात तापाचा सर्व्हे करण्यात आला. मात्र, त्या भागात तापाचा रुग्ण अद्याप सापडला नाही, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. कुडाळ तालुक्यात सर्वत्र आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Related posts: