|Sunday, September 23, 2018
You are here: Home » क्रिडा » पीसीबीला भेटण्याची गरज नाही : गोयल

पीसीबीला भेटण्याची गरज नाही : गोयल 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱयांना पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) अधिकाऱयांची भेट घेवून चर्चा करण्याची काही गरज नाही, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केले आहे.

भारत-पाक यांच्यातील क्रिकेट संबंध पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी भारतीय शासनाच्या परवानगीची जरूरी असते. तथापि भारतीय शासनाकडून उभय देशातील क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली नसताना पीसीबीने पुन्हा या विषयावर चर्चेचे गुऱहाळ मांडण्याचा हेतू समजत नाही, असेही क्रीडा मंत्र्यांनी येथे म्हटले आहे. भारत-पाक सरहद्दीवरील दहशतवादी कारवाया पूर्णपणे थांबल्या जात नाहीत तोपर्यंत उभय देशातील क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यास भारतीय शासनाकडून विचार केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण विजय गोयल यांनी दिले आहे. दुबईत भारतीय क्रिकेट मंडळ आणि पाक क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱयांची बैठक होणार आहे काय असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर क्रीडामंत्र्यांनी वरील खुलासा केला. उभय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीतून काहीच निष्पन होणार नाही तसेच नजिकच्या काळात भारतीय शासनाकडून या प्रस्तावाला होकार दिला जाणार नाही, असेही गोयल यांनी सांगितले.

2015 ते 2023 या कालावधीत स्पर्धा वेळापत्रकानुसार उभय देशात पाच द्विपक्षीय क्रिकेट मालिका भरविण्याची योजना असल्यानेही पीसीबीला सुमारे 387 कोटी रूपयांच्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे आर्थिक  नुकसान वसूल करण्यासाठी पीसीबीने अलिकडेच भारतीय क्रिकेट मंडळाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या संदर्भात बीसीसीआयकडून पीसीबीला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असे सांगण्यात आले.

Related posts: