|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एकरी 150 टन उत्पादन घेण्यास सज्ज व्हावे – वैभव नायकवडी

एकरी 150 टन उत्पादन घेण्यास सज्ज व्हावे – वैभव नायकवडी 

वार्ताहर / वाळवा 

शहरीकरण, क्षारपड समस्या व अन्य अनेक कारणांमुळे जमीन क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी ऊस शेतीमध्ये एकरी 150 टन उत्पादन घेण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन पद्मभुषण क्रांतिवीर डॉ.नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले. ते वाळवा येथे ऊस उत्पादक शेतकऱयांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याच्यावतीने ‘शाश्वत ऊस शेती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ुचे माजी महासंचालक डॉ.डी.जी.हापसे व माजी सल्लागार एस.बी.माने-पाटील यांनी हुतात्मा साखर कारखाना कार्यक्षेत्रेतातील निवडक 200 ते 250 शेतकऱयांना ऊस तंत्रज्ञान, जमीन व्यवस्थापन, पिक पध्दती, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी डॉ.नागनाथआण्णां नायकवडी यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

वैभव नायकवडी पुढे म्हणाले, क्षारपड जमिन, वाढत्या शहरी करणामुळे वाढत जाणारी लोकवस्ती, रस्ते अशा अनेक कारणांमुळे शेती क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी एकरी उत्पादन वाढवण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र व राज्य सरकार ऊस उत्पादकांना सहकार्य करीत नाही. ऊसपीक पाणी जास्त खाते, त्यामुळे ऊस शेतीला विरोध वाढतोय. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आळशी शेतकरी, अशी †िटका होते. तेव्हा शेतकऱयांनी गंभीरता धारण करीत उत्पादन वाढवणे काळाजी गरज आहे. उत्तर प्रदेशात ऊस जास्त पिकतो. तसेच उतारा चांगला आहे. पण हुतात्माने 12 वर्षे देशात रिकव्हरीत पहिला नंबर घेतला आहे. तेव्हा आता 100 नव्हे तर एकरी 150 टन उत्पादन घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

 हापसे म्हणाले, जास्त उत्पादन घेतल्याने तोटा होणार नाही. परंपरागत शेतीला फाटा द्यावा, व गुंठा पावनेचार टन उत्पादन घ्या, डॉ.माने-पाटील म्हणाले, पूर्व हंगामी ऊस लागन करावी. अंतर पिक घेता येते. खर्च वाचतो मशागत, खते, पाणी यांचे योग्य नियोजन केले तर 150 टन एकरी उत्पादन घेता येते. यावेळी किरण नायकवडी, सुनिल मेटकरी, के.के.नायकवडी, वसंत गावाडे, फुलचंद शेटे, शशी गुंजवटे, लाला पाटील यांच्यासह सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते. शेती अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.