|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बारावी परीक्षेत ‘चाटे समूहाची’ निहारीका साळुंखे विभागात अव्वल

बारावी परीक्षेत ‘चाटे समूहाची’ निहारीका साळुंखे विभागात अव्वल 

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (विज्ञान) 2017 परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर केला असून, या परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश प्राप्त करून चाटे समूहाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत चाटे क्लासेसच्या शाहूपुरी, कोल्हापूर शाखेची निहारीका साळुंखे या विद्यार्थिनीने 650 पैकी 603 गुण मिळवून चाटे समूहाच्या कोल्हापूर विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

चाटे समूहाच्या यावषीच्या निकालाच्या वैशिष्टय़ासंबंधी बोलताना चाटे समूहाचे संचालक प्रा. भारत खराटे म्हणाले की, बदललेल्या शैक्षणिक आकृतीबंधाचा विचार करता विद्यार्थ्यांवर आलेले दडपण बारावीच्या या निकालामुळे थोडे कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली केलेले कठोर परिश्रम आणि नियोजन याचेच हे फळ आहे.

खालील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवून चाटे शिक्षण समूहाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यामध्ये 92.77 ते 90 या टक्केवारीत- आदिती खुर्द, राजनंदन देसाई, मुस्कान नाईक, नेहा भोपळे, मंजुषा पाटील, सायली कुशिरे, सुदर्शन पाटील, मृणाल खाडे, श्रध्दा काळे, निहार सुभेदार. 89 ते 85.23 याटक्केवारीत-  वैष्णवी आपटे, यशदीप पाटील, अभिजित गोनुगडे, अर्पित चोपडे, आरती मोळेकर, हिना मुल्ला, हिना बागवान, स्वदेश डफळे, सदफ आत्तार, सुस्मीता मोरे, ओंकार धांडुरे, आकाश लोंढे, अंजली पाटील, गौरी ढोले, सुनिधी पाटील, राहूल भोईटे, सौरभ बच्चे, रेणुका जाधव, दर्शन शहा, सागर शेटे, अनुप गुरव, रोहित जाधव, आफ्रिन मोमीन, शमिता कार्वेकर, श्रीनिवास पाटील, रोहण पाटील, युनुस ल्युड्रीक, सेल्वेस्टर अल्वारीस, अनुज्ञा खराटे, ऋषिकेश टोंगळे, हर्षदा रामदासी, ओंकार मिरजकर, ऐश्वर्या पन्हाळकर, 85 ते 84.31 या टक्केवारीत- प्रतीक्षा खुटाळे, रोहण उपाध्ये, अक्षयकुमार रोडे, शिवानी कारंडे, साक्षी कदम, गायत्री ढवळशंख, सानिया गिडवाणी, राजेश्वरी पाटील, प्रतिक नागटीळे आदींनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले.

सर्व विद्यार्थ्यांचे चाटे समूहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. भारत खराटे यांनी अभिनंदन केले.