|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हिरवाईच्या पर्यावरण शिबिराला प्रतिसाद

हिरवाईच्या पर्यावरण शिबिराला प्रतिसाद 

प्रतिनिधी/ सातारा

वनस्पतीची ओळख करुन घेत विविध खेळ, प्रश्नमंजुषा आणि निसर्गाच्या सानिध्यात सदरबाझार येथील हिरवाईतील पर्यावरण जागृती शिबिरात साताऱयातील महिला रमून गेल्या होत्या. हिरवाई प्रकल्पास 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रकल्पाच्या प्रा. संध्या चौगुले यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. तसेच महिलांसाठी पर्यावरण जागृती शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते.

या शिबिरात ‘चला झाडांशी नाते जोडू या’ उपक्रमात शहर आणि परिसरातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी महिलांचा योगासनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हिरवाईतील सर्व वनस्पतीची आणि विविध प्रकारच्या झाडांची महिलांनी माहिती करुन घेतली. चौगुले यांनी हिरवाई प्रकल्पाचा उद्देश सांगून सर्व वनस्पतींची वैशिष्टय़े सांगितली. त्यानंतर सर्व शिबिरार्थींसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात आली. यामध्ये भाग्यश्री कान्हेरे, कविता चोरगे आणि श्रध्दा देसाई यशस्वी ठरल्या.

स्वच्छता अभियानाचे आयोजन

तसेच परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. यावेळी विजया कदम, कालिंदी घोरपडे, प्रभा ढवळे, तायराशगुप्ता  बागवान, उर्मिला चोरगे, जयश्री बुरुंगले यांच्यासह परिसरातील निसर्गप्रेमी महिला उपस्थित होते. या शिबिरात झाडांचे महत्व पटवून देण्यात आले.

Related posts: