|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपा सभागृह-प्रशासन, कंत्राटदारांच्या वादात कचरा उचल ठप्प

मनपा सभागृह-प्रशासन, कंत्राटदारांच्या वादात कचरा उचल ठप्प 

प्रतिनिधी/ बेळगाव

 विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कचऱयाची उचल करणार नसल्याचे पत्र स्वच्छता कंत्राटदारांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र याबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. महापौरांनी महापालिका आयुक्तांकडे तर आयुक्तांनी महापौरांकडे बोट केले असल्याने कचरा उचल करणार नसल्याच्या भूमिकेवर स्वच्छता कंत्राटदार  ठाम आहेत. सभागृह, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या वादात शहरातील कचऱयाची उचल आजपासून ठप्प होणार आहे.

 दि. 1 जून पासून कचऱयाची उचल करणार नसल्याचे पत्र महापालिकेच्या स्वच्छता कंत्राटदारांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांना दिले होते. पण याबाबत कोणताच विचार महापालिका आयुक्त व महापौरांनी केला नसल्याने गुरुवार दि.1 पासून कचऱयाची उचल थांबविणार असल्याची भूमिका स्वच्छता कंत्राटदारांनी घेतली आहे.

Related posts: