|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऍपेरिक्षा चालक राजमंहमद तांबोळी यांचा प्रामाणिकपणा

ऍपेरिक्षा चालक राजमंहमद तांबोळी यांचा प्रामाणिकपणा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवाजी पुतळा ते गांधीनगर मार्गावर ऍपेरिक्षामधून वडाप व्यवसाय करणारे राजमंहमद तांबोळी यांनी रिक्षामध्ये ग्राहक मधू गंगवाणी यांची विसरेली पर्स प्रामणिकपणे परत त्यांच्याकडे सुपूर्द केली. रिक्षाचालक गंगवाणी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबाबत त्यांचा राष्ट्रीय अन्याय निवारण वाहतूक महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.

  तांबोळी हे शिवाजी पुतळा ते गांधीनगर असा वडाप व्यवसाय करतात. 29 मे रोजी मधू गंगवाणी या  गांधीनगरला जाण्यासाठी तांबोळी यांच्या ऍपेरिक्षमध्ये बसल्या. गांधीनगर येथे उतरताना त्या त्यांची पर्स रिक्षमध्येच विसरल्या. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल असा सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांचा ऐवज होता. रिक्षामध्ये पर्स विसरल्याचीबाब रिक्षाचालक तांबोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी ती पर्स आपल्या ताब्यात घेतली. पर्समधील कागदपत्रांवरुन तांबोळी यांनी गंगवानी यांचा पत्ता शोधून 30 मे रोजी ती पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली. तांबोळी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा राष्ट्रीय अन्याय निवारण वाहतूक महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष रियाज जैनापुरे, कार्याध्यक्ष अल्ताफ शेख, सचिव नाजिम शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related posts: