|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नेपाळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नेपाळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

प्रतिनिधी / बेळगाव

मूळची नेपाळची व सध्या कारभार गल्ली, वडगाव येथे राहणाऱया एका अल्पवयीन मुलीवर तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर सातत्याने बलात्कार झाला असून गुरुवारी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

बुधवारी रात्री 13 वर्षीय नेपाळी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या लक्ष्मण करणसिंग देवकाडी उर्फ दुळे उर्फ नेपाळी (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी लक्ष्मणला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लक्ष्मण हा मूळचा नेपाळचा (रा. बस्ती, जि. मोगलसेन) राहणारा असून सध्या कारभार गल्ली, वडगाव येथे त्याचे वास्तव्य आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून सातत्याने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

शहापूर पोलीस स्थानकात लक्ष्मणविरुद्ध भादंवि 323, 506, 376 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी करून लक्ष्मणला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलीला या तरुणाने जीवे मारण्याची धमकीही दिली असून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.   

Related posts: