|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर : ट्रम्प यांची घोषणा

पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर : ट्रम्प यांची घोषणा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पॅरिह हवामान करारातून अमेरिका बाहेर पडणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केली आहे. 2015मध्ये पॅरिस करार करण्यात आला होता. ‘नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य पार पडण्यासाठी अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडत आहे.,’ असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्याने मोठा फटका बसणार आहे. यामुळे हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर गंभीर परिणाम होणार आहेत. अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्यानंतरही इतर सर्व देश यासाठी आपला पाठिंबा कायम ठेवतील, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी व्यक्त केली आहे.

 

Related posts: