|Monday, April 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटोरोलाने लाँच केला ‘मोटो सी’ स्मार्टफोन

मोटोरोलाने लाँच केला ‘मोटो सी’ स्मार्टफोन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोटोरोला या कंपनीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेसह इतर देशांमध्ये ‘मोटा सी’ हा स्मार्टफोन लाँच केला होता आता या कंपनीने हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला असून त्याची किंमत 5हजार999रूपये एवढी आहे.

हा फोन देशातल्या 100 शहरांमधील स्टोअर्समध्ये लवकरच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ‘मोटो सी’ हा स्मार्टफोन मागच्या माहिन्यात इतर देशांमध्ये 3जी आणि 4जी वर्जनमध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र भारतात या स्मार्टफोनचा फक्त 4जी वर्जन लाँच करण्यात आला आहे. याफोनची स्क्रीन 5 इंच असून 480 ƒ854 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.त्याचबरोबर 1जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल मेमरी असून डय़ुअल सिम आहे. या फोनचा कॅमेरा 5 मेगफिक्सल तर प्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. त्यामुळे आता या फोनला भारतात किती पसंती मिळते हे पहावे लागणार आहे.

 

Related posts: