|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Automobiles » ही आहे पहिली मेड इन इंडिया जीप, लवकरच लाँच होणार

ही आहे पहिली मेड इन इंडिया जीप, लवकरच लाँच होणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कार निर्माती करणाऱया फिएट इंडियाकंपनीने पहिली मेड इन इंडिया जीप लाँच करणार असून या जीपच्या प्रोडक्शनचे 70टक्के पेक्षा अधिक काम भारतात झाले आहे. या जीपचे दोन वर्जन भारतात लाँच होणार असल्याचे या कंपनीने सांगितले आहे.

या जीपमध्ये 2.0लीटर मल्टी जेट डीजल इंजन आहे त्याचबरोबर 170एचपी पावर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करायचे सक्षम यामध्ये आहे. सहा स्पीड गियर बॉक्स देण्यात आले आहेत जे इंजिन बरोबर कन्केट राहतील.तसेच यामध्ये सहा मैन्युअल आणि सात स्पीट डय़ुअल क्लच आहेत जे ऑटोमेटिक कनेक्ट राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या जीपमध्ये सहा एअर बॅग देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या जीपमध्ये रिवर्स कॅमेरा, सेंसर अश्याप्रकारचे लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.

 

Related posts: