|Saturday, November 17, 2018
You are here: Home » उद्योग » उबरकडून ‘इन कॅप एन्टरटेन्टमेंट’

उबरकडून ‘इन कॅप एन्टरटेन्टमेंट’ 

पुण्यातील स्टार्टअप कंपनी सेवा पुरविणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उबर या ऍप आधारित टॅक्सी सेवा पुरविणाऱया कंपनीने देशात प्रायोगिक पातळीवर करमणूक सेवा सुरू केली आहे. यासाठी पुण्यातील कॅबी टॅबी टेक्नोलॉजीस्ची निवड करण्यात आली आहे. उबर कारमध्ये आता ऍन्डॉईड आधारित सेवा पुरविण्यात येईल. सध्या उबरएक्समध्ये पुणे आणि दिल्लीमध्ये प्रायोगिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.

उबरची प्रतिस्पर्धी ओलाने यापूर्वीच ओला प्ले नावाने करमणूक सेवा पुरविण्यास प्रारंभ केला आहे. पुणे येथील श्रीपाल गांधी यांनी यावर्षीच कॅबी टॅबी टेक्नोलॉजीस्चा प्रांरभ केला. ते स्वाईप टेक्नोलॉजीस् या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. या कंपनी अल्प किमतीत स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉचचे डिझाईन आणि उत्पादन घेते. सध्या प्रत्येक महिन्यात 10 लाख ग्राहक या सेवेचा आनंद घेत आहेत. सध्या उबर कॅबमध्ये कॅबीटॅबी लावण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी हंगामा म्युझिक, हंगामा प्ले, टीव्हीएफ, प्रॅन्कमिनिस्टर, फास्ट10, मॉल्सएनडिल्स, यासारख्या कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यात आल्याचे गांधी यांनी म्हटले.

या सेवेदरम्यान प्रवाशांना हवामान, ताज्या बातम्या, शॉर्ट फिल्म्, सॉन्ग् आणि म्युझिक व्हिडिओचा आनंद घेता येईल. याचप्रमाणे एखाद्या शहरात पहिल्यांच प्रवास करत असल्यास त्या शहराची माहिती पर्यटकांना व्हर्च्युअल मार्गदर्शकाच्या सहाय्याने देण्यात येईल. या सेवेदरम्यान जाहिरात करण्यात येईल, ज्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ होईल. ही सेवा ग्राहकांना पुरविण्यासाठी उबर आपल्या चालकांना प्रतिमहिना 1 हजार रुपये देईल.

Related posts: