|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अखेर गझधरबंध पंपिंग 9 जूनला कार्यान्वित होणार!

अखेर गझधरबंध पंपिंग 9 जूनला कार्यान्वित होणार! 

मुंबई / प्रतिनिधी

पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, सांताप्रुझ, खार, वांद्रे येथील काही सखल भागात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचते. त्याचा त्रास येथील नागरिकांना होता. यावर रामबाण उपाय म्हणून महापालिकेने ब्रिम्स्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत गझधरबंध पम्पिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. या पम्पिंगचे काम डिसेंबर 2016 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु पम्पिंगचे काम लांबले. अखेर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सदर पम्पिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून 9 जूनपासून कार्यन्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उशिराने का होईना गझधरबंध पम्पिंगसाठी 9 जूनचा मुहूर्त मिळाला आहे.

26 जुलै 2005 रोजी मुंबई अतिवृष्टी व मिठी नदीला आलेला पूर व तुंबलेला लहान मोठी नाले यांच्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली. त्यावेळी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी पावसाचे पाणी साचते. अशा ठिकाणाचे साचलेले पाणी मोठय़ा क्षमतेचे पम्पिंग स्टेशन उभारला. समुद्रात खाडीत या पाण्याचा निचरा करण्याचे काम ब्रिम्स्टावॅड योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले. एकूण 8 ठिकाणी मोठय़ा क्षमतेचे पम्पिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये किलव्हलॅण्ड, लव्हग्रोव्ह, हाजिअली, इर्ला ब्रिटानिया या 5 पम्पिंगचे काम पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यात आले. आता गझधरबंध (सांताप्रुझ) पम्पिंगचे काम 9 जूनपर्यंत पूर्ण होऊन ते कार्यन्वित केले जाणार आहे. या गझधरबंध पम्पिंगमुळे वांद्रे (प), सांताप्रुझ (प), खार, विलेपार्ले परिसरात साचणारे पावसाचे पाणी जलदगतीने समुद्रात निचरा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना यंदाच्या पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. या गझधरबंध पम्पिंगसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांनी चांगलाच पाठपुरावा केला आहे.

Related posts: