|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » निवडणूक चिन्ह ऐनवेळी बदलणे चुकीचे

निवडणूक चिन्ह ऐनवेळी बदलणे चुकीचे 

प्रतिनिधी/ पणजी

कोणतीही पूर्वसूचना न देता आपले निवडणूक चिन्ह बदलण्यात आल्याने  प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी कैफियत सांताप्रुझ कुजिरा पंचायतीचे प्रभाग 9चे उमेदवार नरेश साळगांवकर यांनी मांडली आहे. आपणाला देण्यात आलेले ’बॉल’ हे चिन्ह बदलून ’डॉल’ देण्याचा निर्णय पणजी मामलेदार सपना बांदोडकर यांनी घेतल्याने त्यांनी त्याला विरोध केला आहे. आपले मूळ चिन्हच पुन्हा द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आपण प्रचार प्रारंभ केला होता. अनेक मतदारांची भेट घेऊन बॉलवरच शिक्का मारण्याचे आवाहन केले होते.

मात्र अचानक 1 जून रोजी मामलेदार कार्यालयातून फोन आला व आपले निवडणूक चिन्ह बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक आहे. या निवडणुकीत आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिब्ंाा नाही. या वार्डात अन्य पाच उमेदवारांना पक्षाचा तसेच आमदारांचा पाठिंबा आहे. ही एक राजकीय खेळी आहे. आज नवीन युवक पंचायत निवडणुकीत पुढे येत असल्याने त्यांना मागे खेचण्याचा हा प्रकार आहे, असे साळगांवकर यांनी सांगितले.

 सरकारी अधिकाऱयांकडून एवढी मोठी चूक होत आहे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा अधिकाऱयांना निलंबित केले पाहिजे. यासंबंधी पंचायतमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.

 

Related posts: