|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पाकिस्तानने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

भारत आणि पाकिस्तान या संघांमधील हाय व्होल्टेज सामना थोड्याच वेळाच सुरु होणार आहे. बर्मिंगहममध्ये होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणचे भारताची भक्कम फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानचा वेगवान मारा, अशी लढत आज पाहायला मिळणार आहे. मात्र भारताचे वेगवान गोलंदाजदेखील इंग्लंडमधील वातावरणाचा फायदा उठवत असल्याने भारताचे पारडे जड मानले जाते आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय फलंदाजी ताकदवान असल्याने या सामन्यात जाणकारांनी भारताला पसंती दिली आहे.

भारतीय संघात कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे जगातील कोणत्याही गोलंदाजीचा समर्थपणे सामना करू शकणारे फलंदाज आहेत. परंतु इंग्लिश वातावरणात आमिर, गुणवान जुनैद खान आणि वहाब रियाझ यांचा सामना करणे हे आव्हानात्मक असेल. फलंदाजीला अनुकूल अशा एजबस्टनच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षाच ठरणार आहे.

Related posts: