|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पीएचडीसाठी प्रवेश मिळविणे आव्हानात्मक

पीएचडीसाठी प्रवेश मिळविणे आव्हानात्मक 

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नियमात बदल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडीसाठी प्रवेश घेण्यासाठीचे नवे नियम आपल्या वेबसाईटवर मांडले आहेत, यानुसार पीएचडीसाठी प्रवेश घेणे आता पूर्वीपेक्षा अधिक आव्हानाचे ठरणार आहे. या नियमांच्या दुरुस्ती संदर्भात संबंधित व्यक्ती 15 जूनपर्यंत आपले मत नोंदवू शकतात.

तृतीय शेणी संस्थेंतर्गत येणाऱया सर्व संस्था अशा उमेदवारांची भरती करू शकतील, ज्यांनी पीएचडीसाठी एनईटी किंवा एसईएलटी किंवा एसईटी परीक्षा पास केली असेल अशी शिफारस मसुदा नियामकाने केली आहे.

?विद्यापीठ 1

युजीसीने विद्यापीठ 1 साठी 3.5 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह नॅकद्वारे मान्यता मिळविणे किंवा संस्थेने एनआयआरएफच्या पहिल्या 50 संस्थांमध्ये सलग 2 वर्षे स्थान मिळविण्याची अट ठेवली आहे.

?विद्यापीठ 2

नॅकद्वारे 3.01 आणि 3.49 दरम्यान गुणांसह मान्यता मिळालेली असावी किंवा एनआयआरएफ 2 वर्षांसाठी 51 ते 100 संस्थांमध्ये स्थान मिळविणे गरजेचे आहे.

?विद्यापीठ 3

विद्यापीठ 3 शेणीतील संस्था या पहिल्या दोन शेणीत समाविष्ट नसणाऱया संस्था असतील. नव्या नियमानुसार ज्यांनी एनईटी किंवा एसईएलटी किंवा एसईटी परीक्षा पास केली आहे, त्यांनाच पीएचडीसाठी अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकेल.

Related posts: