|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नेपाळ-चीनच्या कंपनीदरम्यान जलविद्युत प्रकल्पासाठी करार

नेपाळ-चीनच्या कंपनीदरम्यान जलविद्युत प्रकल्पासाठी करार 

काठमांडू :

 नेपाळ सरकार आणि चीनच्या कंपनीदरम्यान 1200 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी करार झाला आहे. नेपाळ सरकारद्वारे मागील महिन्यात चीनच्या गेझूबा समूहाला कंत्राट देण्यात आल्यानंतर चालू आठवडय़ात या प्रकल्पासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱया झाल्या. या करारांतर्गत चिनी कंपनी प्रकल्पाचा आराखडा आणि निर्मिती कार्यांचे व्यवस्थापन करेल. करारानुसार प्रकल्पासाठीचा निधी नेपाळ सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून कर्जाच्या रुपात चीनच्या वित्तीय संस्थांकडून उभारला जाणार आहे. चीनची कंपनी प्रकल्प पूर्णपणे विकसित करण्याची जबाबदारी घेणार आहे. तर नेपाळ सरकार प्रकल्पाच्या निर्मितीसाठी रक्कम उभारण्याकरता प्रतिलिटर पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या दरावर पायाभूत कर आकारणार आहे. नेपाळमधील अनेक प्रकल्पांमध्ये चीनची भागीदारी वाढली आहे. नेपाळला सध्या विकासकामांसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे भाग पडले आहे.

Related posts: