|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय मुलीला उद्देशून सीएनएन अँकरकडून वर्णद्वेषी टिप्पणी

भारतीय मुलीला उद्देशून सीएनएन अँकरकडून वर्णद्वेषी टिप्पणी 

न्यूयॉर्कः

 अमेरिकेची वृत्तवाहिनी सीएनएनच्या एका निवेदिकेवर स्पेलिंग बी स्पर्धेची विजेती भारतीय वंशाची अनन्या विजय हिला उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्याचा आरोप झाला आहे. सीएनएनची निवेदिका अलिस्यान कॅमेरोटाने अनन्याची मुलाखत घेतली होती. मुलाखत संपल्यानंतर कॅमेरोटा याने अनन्याला कॉवफेफे शब्दाचे स्पेलिंग विचारले. अनन्याने या शब्दाचा अर्थ सांगण्याची सूचना केली. याचबरोबर तिने हा शब्द कोणत्या भाषेतील असल्याचे विचारले. कॉवफेफे एका निरर्थक शब्द असून तो संस्कृतमधून घेण्यात आला की नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही, संस्कृत भाषेचा वापर तुम्ही लोक अनेकदा करता, मी ती जाणत नाही असे कॅमेरोटाने म्हटले.

कॅमेरोटाच्या या टिप्पणीनंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

Related posts: