|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » भारताची प्रत्येक मॅच स्टेडिअमध्ये जाऊन पाहणार ; माल्ल्या

भारताची प्रत्येक मॅच स्टेडिअमध्ये जाऊन पाहणार ; माल्ल्या 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय बँकांचे हजोरो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेला विजय मल्ल्याने चॉम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत – पाकिस्तान सामन्याला उपस्थिती लावली आणि सगळय़ांच्या भुवया उंचावल्या. रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत – पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिधानस्तपणे व्हीआयपी सेक्सनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

सोशल मिडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरून आपले म्हणणे मांडले. ‘भारत – पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मिडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाटी सगळय़ा सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे., असे सांत माल्ल्याने आपण बिधानस्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचे सांगत एकाप्रकारे आव्हानचे देऊन टाकले आहे.

 

 

Related posts: