|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालू कन्या मीसा यांना आयकरची पुन्हा नोटीस

लालू कन्या मीसा यांना आयकरची पुन्हा नोटीस 

बेनामी जमीन खरेदी प्रकरण 12 रोजी हजर राहण्याचे आदेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोटय़वधी रूपयांच्या जमीन खरेदी प्रकरणी आयकर विभागाने लालूकन्या मीसा भारती यांना 12 रोजी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. याआधी आयकरने 6 रोजी हजर राहण्याची सूचना केली होती. परंतु मीसा यांच्या वकिलाने म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने आयकर विभागाने नव्याने नोटीस दिली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि राज्यसभेच्या सदस्या असलेल्या मीसा भारती यांना मंगळवार 6 रोजी हजर राहण्याबाबत आयकर विभागाने नोटीस दिली होती. परंतु मंगळवारी त्यांच्या वकिलाने यासाठी मुदत मागितली आहे. वकिलांच्या या मागणीनुसार आयकर विभागाने 12 रोजी हजर राहण्याची सूचना केली आहे. मीसा यांचे पती शैलेशकुमार यांनाही आयकर विभागाने गेल्या 16 मे रोजी नोटीस पाठवली होती. त्यांच्याकडे बुधवार 7 रोजी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

तर याआधी इडीने मीसा यांचे सीए राजेश अग्रवाल यांना अटक केली आहे. कोटय़वधीच्या घोटाळय़ाप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मीसा यांचे काळेधन पांढरे करण्यासाठी अग्रहवाल यानी मदत केल्याचा आरोप आहे. मीसा यांची कंपनी मिशेल पॅकर्स अँड प्रिंटर्स या कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार केला असल्याचा आरोप आहे. तसेच लालू यादव यांच्या दिल्ली, गुडगावसह अन्य 22 ठिकाणी आयकर विभागाने छापे घालून अक्षेपाहार्य कागदपत्रे जप्त केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सुमारे एक हजार कोटीचा जमीन खरेदीविक्री घोटाळा झाला आहे. त्याच अनुशंगाने हे छापे घातले आहेत. लालू यांचे समर्थक प्रेमचंद गुप्ता यांच्याही निवासस्थानी छापे मारले होते. भाजपचे  बिहार प्रदेश अध्यक्ष सुशीलकुमार मोदी यांनी लालू आणि त्यांच्या परिवारावर जमीन घोटाळय़ाचा आरोप केला होता.

Related posts: