|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » भारताविरोधात श्रीलंकेने आक्रमक क्रिकेट खेळावे- संगकारा

भारताविरोधात श्रीलंकेने आक्रमक क्रिकेट खेळावे- संगकारा 

वृत्तसंस्था/ कोलंबो

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या पराभवामुळे श्रीलंकन संघ बॅकफूटवर ढकलला गेला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱया करो वा मरो सामन्यात श्रीलंकन संघाने आक्रमक खेळावे, असा सल्ला कुमार संगकाराने दिला आहे. आयसीसीसाठी लिहलेल्या खास लेखात संगकाराने आपल्या संघाला हा सल्ला दिला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचा पराभव करणे सहजासहजी शक्य नाही. श्रीलंकेला या स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर आठ जून रोजी भारताविरुद्ध होणाऱया लढतीत कोणत्याही विजय मिळवणे गरजेचे आहे, असे संगकारा याप्रंसगी म्हणाला. लंकेच्या युवा संघाने या सामन्यात आक्रमतेने खेळावे. संघातील प्रत्येक खेळाडूने आपली प्रतिभा दाखवू द्यावी. लंकेची सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन्ही कर्णधार भारताविरोधात खेळू शकणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मर्यादित वेळेत षटके न टाकल्यामुळे आयसीसीने उपुल थरंगावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. तर मॅथ्यूज दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे लंकन संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

भारताविरुद्ध लढतीत विजयाचा पाया रचण्यासाठी पहिल्या दहा षटकांत जास्तीत फलंदाज बाद करावे लागतील. मागील काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजानी चांगली कामगिरी केली आहे. लंकेच्या तुलनेत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण व गोलंदाजी अधिक भक्कम आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे आव्हान कायम ठेवायचे असल्यास लंकेच्या संघाला सर्वच स्तरावर भारतापेक्षा वरचढ कामगिरी करावी लागेल, असेही संगकाराने याप्रंसगी नमूद केले.

Related posts: