|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाणी पुरवठा सभापती 24 बाय सात तास सातारकरांच्या सेवेत

पाणी पुरवठा सभापती 24 बाय सात तास सातारकरांच्या सेवेत 

प्रतिनिधी/ सातारा

सध्या सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पालिकेत सत्तेत असलेल्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची सतत येजा पालिकेत सुरु असते. तसेच सातारा विकास आघाडीच्या नेत्यांचीही अचानक व्हिजीट ठरलेली असते. गेल्या चार दिवसांपूर्वीच अशीच राजमाता कल्पनाराजे यांनी अचानक भेट दिली. त्यामध्ये पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांच्या चांगल्या कामांचे कौतुक केले. प्रत्यक्षात सभापती सुहास राजेशिर्के हेच सातारकर नागरिकांसाठी ऑन डय़ुटी 24 तास असल्याचा प्रत्यय सातारकरांना येवू लागला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गल्लीतील साधी तक्रार जरी आली तरीही त्याची नोंद घेवून स्वतः ते निपटारा करण्यासाठी सांगतात.

सातारा पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींमध्ये पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांच्यावर नेत्यांनी जबाबदारी दिली. त्यांनी जबाबदारी दिल्यापासून तेही कुठे कमी पडले नाहीत.यापूर्वीच्या काही सभापतींनी तर केबीनकडे काही महिने फिरकणेही पसंत केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत नाराजीचा सुर कर्मचाऱयांमध्येच होता. आता मात्र सुहास राजेशिर्के हे सभापती झाल्यापासून शहरातील पाणी पुरवठा करणाऱया सर्व योजनांची अपडेट त्यांच्याजवळ असते. एवढेच नव्हे तर कोणती टाकी किती वेळात भरेल, काय अडचण निर्माण होते ती सोडविण्यासाठी काय करावे लागले हेही लगेच सांगतात. तसेच कोणत्या अर्पाटमेंटला कमी दाबाने कित्येक वर्षाने पाणी पुरवठा होतोय, तो कशामुळे हे नियमित सातारकरांचे काम केल्यामुळेच त्यांना हे सर्व बारकाईने माहिती पडले आहे. त्यामुळे कसल्याही समस्येसाठी नागरिकांनी जर फोन केला तर तो फोन थेट सभापती सुहास राजेशिर्के यांच्या केबीनमध्ये पाठवला जातो. स्वतः सभापतीच त्या नागरिकांला उत्तर देतात, त्यामध्ये जाग्यावर कर्मचाऱयांना सुचना देवून लागलेली गळती, कमी दाबाने येत असलेले पाणी याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही केली जाते. असाच प्रकार समर्थ मंदिर चौकात घडल होता. समर्थ मंदिर चौकातही गटारावरील झाकणाची मोडतोड झाली होती. एका सजग नागरिकाने त्याबाबत पालिकेला माहिती दिली. पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी त्या झाकण बसविण्याच्या कामाला लगेच सुरुवात केली. त्यांच्या या सवयीमुळे पूर्वीचे पाणी पुरवठा सभापती गोपाळराव औताडे यांचीच आठवण सातारकरांना होवू लागली. चार दिवसांपूर्वी पालिकेत राजमाता कल्पनाराजे भोसले या येवून गेल्या. त्यांनी प्रत्येक विभागात जावून चौकशी केली. सभापतींच्याही केबीनमध्ये आणि पाणी पुरवठा विभागात गेले. विभागातील कामाची पद्धत पाहून सभापतींचे त्यांनी कौतुक केले. इतर काही विभागातील काही कर्मचाऱयांना आणि नगरसेवकांचेही त्यांनी कान उपटले. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये कमराबंद चर्चा तब्बल दीड तास सुरु होती.

पालिकेत बसवले डसबीन

पालिकेच्या इमारतीत कुठेंही अस्वच्छता होवू नये यासाठी तीन डसबीन पालिकेत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या डसबीन केबीनबाहेर ठेवल्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांना कचऱयाच्या डब्याजवळ उभे केल्यामुळे कर्मचाऱयांचा अवमान होतो आहे, अशी खदखद पालिका युनियनच्या काही पदाधिकाऱयांनी खदखद व्यक्त केली.

Related posts: