|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सुवासिनींकडून वटपौणिमा व्रत उत्साहात साजरे

सुवासिनींकडून वटपौणिमा व्रत उत्साहात साजरे 

वटवृक्ष पूजनासाठी सुवासिनींची गर्दी

प्रतिनिधी /रत्नागिरी

‘हाच पती जन्मोजन्मी लाभू दे’ असे आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्याचे साकडे सुवासिनींनी वटपौणिमेला परमेश्वराला घातले. पारंपरिक शृंगार करून सुवासिनींनी वटपौणिमेनिमित्त सकाळपासूनच वटवृक्षाच्या पूजनासाठी गर्दी केली होती. रत्नागिरीत मुख्यत्त्वे प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल मंदिर येथील वटवृक्षाच्या ठिकाणी सकाळपासूनच सुवासिनींनी पूजनासाठी गर्दी केली होती. नवविवाहितांची पहिल्या वटपौणिमेची लगबग अधिक दिसून येत होती.

प्रतिवर्षीप्रमाणे हिंदूधर्मातील वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनींनी श्रद्धेने साजरे केले. आजच्या युगात विविध सणासुदीला नावे ठेवण्याचे प्रमाण वाढले असताना, महिलांत या व्रताचे महत्त्व आजही टिकून असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. वटपौणिमेनिमित्त साजशृंगार केलेला फोटो आजच्या नवविवाहितां सोशल मिडीयावर अपलोड करायला विसरल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे फेसबुक वटपौणिमेनिमित्त सुवासिनींच्या फोटोंनी सजून गेला होते.

हे व्रत पूर्वापार चालत आलेले आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यात केंद्रस्थानी असलेल्या वटवृक्षाचे संवर्धन झाले आहे. तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारे व्रत म्हणून याकडे पाहिले जाते. भविष्यात या व्रताद्वारे महिलांनी या संदेशाचाही प्रचार-प्रसार करावा, अशीही अपेक्षा आहे.