|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » घरफोडीतील 9 गुन्हे उघडकीस

घरफोडीतील 9 गुन्हे उघडकीस 

सोलापूर / प्रतिनिधी

आर्थीक गुन्हे शाखेच्या विभागाने घरफोडीतील 9 गुन्हे उघडकीस आणले असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच यात 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, 200 ग्रॅम चांदीचे वस्तू व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 14 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोविंद दिगंबर नारायणकर (वय 32, रा. स्वागत नगर, सोलापूर), दुर्गप्पा कामप्पा श्रीराम (वय 30, रा. मौलाली चौक, सोलापूर) आणि शशिकांत अनिल राक्षे (वय 40, रा. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

यातील आरोपी गोविंद नारायणकर आणि दुर्गप्पा श्रीराम या दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा धुमाकुळ घातला होता. सलग दोन-तीन वर्ष त्यांनी घरफोडी केली. दरम्यान गुप्तहेरांकडून या दोघांची माहिती मिळाली. त्याअनुशंगाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दोनही आरोपींना अटक केले. या दोघांकडून चार गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून 1 लाख रूपये किंमतीचे 40 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या दोघांची चौकशी केली असता त्यांच्यासोबत अन्य साथीदार असल्याचेही स्पष्ट केले आहेत.

तसेच तिसरा आरोपी शशिकांत राक्षे याने सदर बझार व विजापूर नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा सपाटा लावला होता. शशिकांत याला अटक करुन चौकशी केले असता त्याने 5 गुन्हे केल्याचे कबुली दिली. त्याच्याकडून 2 लाख 14 हजार 900 रूपये किंमतीचे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने, 200 ग्रॅम चांदीचे दागिने, पाच मोबाईल आणि रोख 25 हजार रूपये जप्त करण्यात आला आहे.

या तीघांकडून 9 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण 3 लाख 14 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय कोळेकर, दगडू राठोड, जयंत चवरे, संजय बायस, अनिल वळसंगे, संजय पवार, राकेश पाटील, अप्पासाहेब पवार, सुभाष पवार आदींनी केली आहे.

 

Related posts: