|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा पालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई

फोंडा पालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पालिकेने सोपो प्रश्नावर निर्णयाची अंमलबजावणी करताना बाजार परीसरातील व्यापाऱयानी केलेल्या अतिक्रमणाविरोधात मोहिम राबविली. याप्रकरणी नियमाचे उल्लघन करणाऱयाविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले. तसेच पालिकेच्या यादीत नसलेल्या व्यापाऱयाना हटविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नवनाथ नाईक यानी यावेळी बोलताना दिली. 

मागील पालीका बैठकीत सोपो थकबाकीदारांना नोटीस बजावल्या होत्या. मागील तीन वर्षांमध्ये सोपोच्या माध्यमातून थकबाकी असलेल्या एक कोटी रुपयांच्या वसुलीसाठी व्यापाऱयांना नोटीसा जारी करण्यात आल्या होत्या त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आली.

यापैकी काही व्यापाऱयांकडून थकबाकी वसूल झाली आहे. फोंडा मार्केट प्रकल्पात बसणाऱया एकूण 257 व्यापाऱयांना या नोटीस बजावण्यात आल्या. त्यानुसार 50 ते 60 जणाकडून थकलेला सोपो कर गोळा करण्यात आला. ही वसुली करताना या व्यापाऱयांना पालिकेने काही अंशी सवलतही दिली आहे.   जुलै 2014 ते मार्च 15 साठी 7 रुपये चौ. मिटर प्रति दिवशी याप्रमाणे ही रक्कम आकारण्यात येत आहे. तसेच 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 पर्यत थकलेला सोपोकरावर 8 रुपये  8 प्रति चौ. मिटर तर 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 पर्यत 9 रुपये  प्रति चौ. मिटर या प्रमाणी ही वसुली केली जात आहे. चालू वर्षांसाठी 10 रुपये सोपो आकारण्यात येईल.

थकबाकी वसूलीसाठी खास पथक कार्यरत असून भविष्यात सोपोधारकांना पालिका कायद्यानुसार अंमलबजावणी करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानुसार अतिक्रमणे व रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणऱया व्यापाऱयावर धडक कारवाई करण्य़ात आली. तसेच अतिक्रमणे हटवून त्याना सोपो कर आकारणीसाठी जागा मोजून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

Related posts: