|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » मान्सूनची तळकोकणात दमदार हजेरी

मान्सूनची तळकोकणात दमदार हजेरी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मान्सूनने तळकोकणात वर्दी दिली आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये हजेरी लावल्यानंतर राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. आता पुढच्या 72 तासात मान्सुनचे कोकणच्या दिशेने पुनरागमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

राज्यातल्या काही भागात पावसाला सुरूवात झाली असताना मुंबईतही रात्री पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच दादर, प्रभादेवी, लालाबाग, भायखळा भागात रात्री मुसळधार पाऊस झाला. पश्चिम उपनगरांमध्येही विलेपार्ले,अंधेरी, जोगेश्वरी, मलाड, कांदिवली, मीरा रोड या भागांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. नवी मुंबईतही पावसाची हजेरी जोरदार होती. रात्रीच्या पावसामुळे मुंबईच्या हवेत एक वेगळाच गारवा अनुभवायला मिळत आहे.

 

Related posts: