मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी संप चिघळला

ऑनलाईन टीम / मुंबई :
शेतकऱयांसाठी विविध योजना आखणाऱया मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाल्याची चर्चा सध्या भाजपच्याच नेत्यांमध्ये सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना विचारात घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकरी प्रतिनिधींशीच मध्यरात्री चर्चा केल्यानंतर हे वातावरण चिघळले. रात्रीच्या वेळी चर्चा झाल्याने इतर शेतकऱयांच्या प्रतिनिधींमध्येही संशयाचे जाळे पसरले आहे.अजूनही शेतकऱयांच्या प्रश्नांवर तोडगा निघत नसल्याने यातून मुख्यमंत्र्यांची अपरिपक्वता दिसून येत आहे. यातून मुख्यमंत्री एकटे पडल्याचे चित्र दिसून येत आहे.