|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रेल्वेसाठी खासदार शेटींचे प्रयत्न अपुरे-आमदार सुरेश हाळवणकर

रेल्वेसाठी खासदार शेटींचे प्रयत्न अपुरे-आमदार सुरेश हाळवणकर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात रेल्वे आणली. रेल्वेमुळे कोल्हापूर अन्य शहरांशी जोडले जाऊन व्यापार वाढला. आता कोल्हापूर -वैभववाडी मार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर कोकणला जोडल्यावर अधिक विकास होणार आहे. इचलकरंजीही रेल्वेने जोडले जाणार आहे. पण खासदार राजू शेटी यांचे रेल्वेसाठीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत अशी टीका आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी कराड येथून व्हिडिओ लिकिंगद्वारे रेल्वेच्या  विविध कामांचा शुभारंभ झाला. यावेळी कोल्हापूरात झालेल्या कार्यक्रमात आमदार हाळवणकर बोलत होते.

कोल्हापूर- वैभवववाडी मार्गाचे भूमिपूजन, फलटण – पंढरपूर, जेवूर-आष्टी रेल्वे मार्गं ,मध्य रेल्वे व पी.जी.सी.आय.एल. हातकणंगले- इचलकरंजी रेल्वे मार्गाची पाहणी. कोल्हापूर पुणे विद्युतीकरण पॉवर ग्रीड कार्पोरेशन सामंजस्य करार,जेऊर आष्टी या नवीन रेल्वे लाईनचे सर्वेक्षण अशा कार्यक्रमांचा शुभारंभ रविवारी कराड येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते संपन्न झाला. व्हिडिओ लिकिंगद्वारे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोल्हापूरातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज टर्मिनस आणि सेलापूर रेल्वेस्थानकावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरातील कार्यक्रमावेळी महापौर हसीना फरास, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, अरुंधती महाडिक, स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना उपस्थित होते.

कराड येथे सुरु असलेल्या उदघाटन सोहळयाच्या लाईव्ह चित्रणाची सोय कोल्हापूरात करण्यात आली होती. या सोहळयाप्रसंगी बोलताना आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर आता कोकणला जोडले जाणार आहे. या रेल्वेमार्गामुळे वाहतूक आणि व्यापार अधिक सुलभ तसेच जलद होणार आहे. कोल्हापूर -पुणे  रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे कोल्हापूर पुण्यामधील एक तासांचा अवधी कमी होणार आहे. तर इचलकरंजी शहर रेल्वेला जोडल्याने फायदा होणार आहे. मात्र खासदार राजू शेटी यांचे रेल्वेसाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. इचलकरंजी रेल्वेमार्गात काही शेतकऱयांच्या जमिनी जाणार आहेत. पण त्यांचे नुकसान होणार नाही तर दराप्रमाणे शेतकऱयांना मोबदला मिळेल. या मार्गाला काहींचा विरोध आहे, शेतकऱयांची चर्चा करुन त्यांची समजूत काढली जाईल.

महापौर हसीना फरास म्हणाल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूरात रेल्वे सुरु झाली. आता नवीन कामामुळे आणखी विकास होईल असे सांगत शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला समीर सेठ, रेल्वे अधिकारी प्रफ्फुल  चंद्रा, नगरसेविका शोभा कवाळे यांच्यासह मान्यवर आणि प्रवासी उपस्थित होते.

Related posts: