|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सावर्डे पंचायतीत उत्स्फूर्त मतदान

सावर्डे पंचायतीत उत्स्फूर्त मतदान 

प्रतिनिधी/ कुडचडे

सावर्डे ग्रामपंचायतीत एकूण 9 प्रभाग असून त्यातील प्रभाग क्र. 6 मध्ये बिनविरोध निवड झाल्यामुळे राहिलेल्या 8 प्रभागांमध्ये रविवारी मतदान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 4524 मतदारांनी मतदान केले असून त्यात 2179 पुरुष व 2345 महिला मतदारांचा समावेश आहे.

सदर पंचायतीत 8 प्रभागांतून एकूण 11 महिला उमेदवार व 17 पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागवार मतदान पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक 1 : 353 पुरुष व 413 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 2 : 311 पुरुष व 356 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 3 : 331 पुरुष व 367 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 4 : 230 पुरुष व 213 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 5 : 186 पुरुष व 214 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 7 : 290 पुरुष व 268 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 8 : 268 पुरुष व 278 महिला मतदार, प्रभाग क्रमांक 9 : 210 पुरुष व 236 महिला मतदार.