|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोली तालुक्यात न्हावेलीत सर्वाधिक मतदान

डिचोली तालुक्यात न्हावेलीत सर्वाधिक मतदान 

प्रतिनिधी/ डिचोली

डिचोली तालुक्यातील 17 पंचायतीच्या एकूण 124 प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत 85 टक्क्यांवर मतदान झाले. सर्वाधिक मतदान न्हावेली पंचायतीसाठी झाले. त्या पाठोपाठ अडवलपाल पंचायतीसाठी मतदान झाले. सर्वच पंचायतींसाठी शांततेत मतदान झाले. केवळ कारापूर सर्वण पंचायतीतील एका उमेदवाराने आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

लाटंबार्से पंचायतीसाठी 90.11 टक्के मतदान झाले. पिळगाव पंचायतीसाठी 90.17 टक्के मतदान झाले. मेणकुरे पंचायतीसाठी 90.65 टक्के, मुळगाव पंचायतीसाठी 90.57 टक्के, अडवलपालसाठी 94.48 टक्के मतदान झाले. नार्वे पंचायतीसाठी 89.78 टक्के, म्हावळींगे कुडचिरे पंचायतीसाठी 91.62 टक्के, मये वायंगिणीसाठी 90.79 टक्के, साळसाठी 87.19 टक्के, न्हावेलीसाठी 94.55 टक्के, पाळी कोठंबीसाठी 91.4 टक्के, सुर्ल पंचायतीसाठी 93.5 टक्के, वेळगेसाठी  90.8 टक्के, आमोणा पंचायतीसाठी 93 टक्के, कारापूर सर्वणसाठी 87.53 टक्के, कुडणे पंचायतीसाठी 91.18 टक्के तर शिरगाव पंचायतीसाठीही बऱयापैकी मतदान झाले आहे. संपूर्ण तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.