|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौथी, सातवीसाठी टॅलेन्ट सर्च परीक्षा

चौथी, सातवीसाठी टॅलेन्ट सर्च परीक्षा 

प्रतिनिधी/ ओरोस

प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱया चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची टॅलेंट सर्च परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातून सातवीच्या प्रत्येक तालुक्यातील पहिल्या तीन अशा एकूण 24 विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सहल घडवली जाणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा जि. प. शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा
प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले, सदस्य संपदा देसाई, राजन मुळीक, सरोज परब, उन्नती धुरी, विष्णूदास कुबल, सतीश सावंत आदी उपस्थित होते.

जि. प. शिक्षण विभागाने यावर्षीपासून काही नवीन योजना हाती घेतल्या असून यामध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक सहल, चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च स्पर्धा परीक्षा, क्रीडा साहित्य व संगीत साहित्य पुरवठा, शैक्षणिक साहित्य निर्मिती आदी योजनांचा समावेश आहे.

                     यशस्वी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सहल

चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा बंद झाल्याने या मुलांसाठी जि. प. मार्फत सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पाच लाखाची तरतूद अपेक्षित आहे. तर या परीक्षेत तालुकास्तरावर प्रथम तीन विद्यार्थी निवडले जाणार आहेत. यामधून केवळ सातवी परीक्षेतील प्रत्येक तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकांना वैज्ञानिक सहल घडविली जाणार आहे. सिंधुदुर्गातून
वैज्ञानिक घडविण्यासाठीचा हा प्रयत्न असून त्यांना विमानातून प्रवास घडविला जाणार आहे.