|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अवघ्या दोन महिन्यातच कोसळली पाण्याची टाकी

अवघ्या दोन महिन्यातच कोसळली पाण्याची टाकी 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

नागरिकांच्या सोयीसाठी पाणी पुरवठा मंडळाच्यावतीने शहरातील विविध भागात कूपनलिका आणि विहिरींचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याकरिता ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्मया उभारण्यात आल्या आहेत. मात्र अशोकनगर येथे पाण्याची टाकी कोसळली असल्याचे निदर्शनास आले आहे.

उन्हाळय़ात पाणी टंचाई निर्माण झाल्याने ठिकठिकाणी सिन्टेक्स टाक्मयांची उभारणी करून पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा मंडळाने केला आहे. पण या कामांचा दर्जा मात्र निकृष्ट आहे. कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. शहरात 900 हून अधिक टाक्मया दोन वर्षांत बसविण्यात आल्या आहेत. पण अलिकडे बसविण्यात आलेल्या टाक्मयांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार होत आहे.

अशोकनगर येथे बसविण्यात आलेली पाण्याची टाकी दोन महिन्याच्या अवधीतच कोसळली आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या इमारतीच्या भिंतीमुळे टाकीचे नुकसान झाले नाही. पण जलवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कारभाराबाबत  नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाणी पुरवठा मंडळाचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. पाणी पुरवठा मंडळाशी महापालिकेचा काहीही संबंध नसल्याचे सांगून पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी स्वतंत्रपणे कारभार करीत असतात. पण निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नगरसेवकांना विचारणा होत आहे. पण याबाबत नगरसेवकांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे बोट करून हात वर केले आहेत. यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Related posts: