|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्गावर चाकू हल्ला करत डेमो कार चालकाला लुटले

महामार्गावर चाकू हल्ला करत डेमो कार चालकाला लुटले 

महामार्गावर वेरळ येथील घटना

कणकवलीतून परतणारा जागृत मोटर्सचा कर्मचारी जखमी

वसुलीचे 2 लाख 11 हजार लंपास

स्विफ्टमधून आलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी /लांजा

कणकवली येथून पंपनीची वसुली रक्कम घेऊन डेमो कारने रत्नागिरीच्या दिशेने परतत असणाऱया जागृत मोटर्सच्या कर्मचाऱयावर चाकू हल्ला करून त्याला लुटल्याचा प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडल़ी यावेळी कर्मचाऱयांच्या ताब्यातील 2 लाख 11 हजार 405 रुपयाची रक्कम हल्लेखोरांनी लंपास केली आहे. या हल्ल्यात महेश अरुण पालव (रा.एमआयडीसी,रत्नागिरी) हा जागृत मोटर्सचा कर्मचारी जखमी झाला आह़े

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार रत्नागिरी एमआयआडीसी येथील जागृत मोटर्सचा कर्मचारी महेश पालव हा गेली 5 वर्ष कंपनीत चालक म्हणून कार्यरत आह़े कणकवली, कुडाळ व राजापूर या ठिकाणी असणाऱया जागृत कंपनीच्या शाखांमधील वसूली करण्यासाठी व कणकवली येथे कंपनीची असणारी डेमो (इग्निस) कार रत्नागिरी येथे आणण्यासाठी महेश पालव हा शनिवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी येथून अल्टो कार घेऊन कणकवलीकडे गेला होत़ा प्रथम त्यांने कंपनीच्या राजापूर शाखेमधून 56 हजार 500, कुडाळ शाखेतून 54 हजार 435 रुपये, कणकवली येथून 33 हजार 700 रूपयांची वसुली रक्कम ताब्यात घेतली. त्याचबरोबर कणकवली येथून इग्निस डेमो कार घेऊन तो रत्नागिरीकडे परतीच्या प्रवासाला निघाल़ा येताना त्याने पुन्हा राजापूर शाखेमधून आणखी 6 हजार 680 रुपयांची रक्कम ताब्यात घेतली.

एकूण 2 लाख 11 हजार 405 रुपये घेऊन तो रत्नागिरीच्या दिशेने येत होत़ा रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास महेश पालव कंपनीची गाडी घेऊन लांजा तालुक्यातील वेरळ येथे आला असता समोरुन येणाऱया स्विफ्ट †िडझायर कार मधून आलेल्या चार जणांनी त्याची गाडी अडवली. शिगीवाळ करत एका महिलेला धडक दिल्याचा जाब विचारत त्यातील एकाने महेश पालव याच्या छातीवर व डाव्या हातावर धारधार शस्त्राने वार केल़ा दुसऱयाने पालव यांच्या खिशातील 20 हजार रुपयाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल काढून घेतला. एकाने स्टेअरिंग जवळ ठेवलेले रोकड उचलली व त्यानंतर चौघानी तेथून पोबारा केल़ा

हल्लेखोरांनी केलेल्या हल्यात महेश जखमी झाला. महामार्गावरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱया एक वाहन थांबवून त्यांने उपचारासाठी मदत मागितली. यावेळी या वाहनचालकाने त्याला पाली ग्रामीण पोलीस स्थानकापर्यंत सोडले. या प्रकाराची माहिती त्याने पोलीसांनी दिली. लांजा पोलिसांनी महेश पालव याला प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे उपचारासाठी दाखल केल़े या घटनेची नोंद लांजा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Related posts: