|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

प्रतिनिधी/ पणजी

मुसळधार पावसामुळे काल सोमवारी जनजीवन विस्कळीत झाले. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.

गेल्या 24 तासात सर्वाधिक 7 से.मी. पावसाची नोंद केपेमध्ये झाली. सांखळी व वाळपईत प्रत्येकी 6 से.मी., मडगाव व मुरगावमध्ये प्रत्येकी 5 सें.मी., दाबोळीत 3 सें.मी. व सर्वांत कमी 1 सें. मी. पावसाची नोंद पेडणेमध्ये झाली.

गोव्याच्या किनारी भागात मोठय़ा प्रमाणात पावसाळी ढग जमले असून दिवसभर मुसळधार पावसाने राजधानी पणजी तसेच इतर शहरे व ग्रामीण भागाला झोडपून काढले. हवेत गारवा निर्माण झाला आहे. किमान तापमान 24.7 डि. सें. तर कमाल तापमान 8 डि. सें. पर्यंत खाली उतरले. 24 तासात पणजीत 2 से. मी. पावसाची नोंद झाल्याने एकूण पाऊस आता 19 इंच झाला आहे. आज व उद्या राज्यात जोरदार वादळी वाऱयासह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली.