|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » बांगलादेशात भूस्खलन ; 26 जणांचा मृत्यू

बांगलादेशात भूस्खलन ; 26 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / ढाका :

बांगलादेशच्या दक्षिणपूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात भूस्खलन झाले. तसेच या भागात पूर देखील आला आहे. त्यामुळे या भूस्खलन आणि पुरामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशच्या दक्षिणपूर्व भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या भागातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेतील पीडितांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर कार्य करत आहे. लष्कराचे इंजिनिअर आणि मेडिकल कॉर्प्सचे जवान बचावकार्यात लागले आहेत.

Related posts: