|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » सैराटची अर्ची दहावी पास

सैराटची अर्ची दहावी पास 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरूला दहावीच्या परिक्षेत 66.40 टक्के गुण मिळाले आहेत. नववीच्या तुलनेत तिच्या टक्का घसरला आहे.

रिंकूच्या दहावीच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मिडीयावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर ‘अर्ची’ने दहावीच्या परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’यश मिळवले आहे. रिंकूला 500 पैकी 327गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी87,इंग्रजी59, गणित48, सायन्स 42, सामजिकशास्त्र 50,असे यश तिने मिळवले आहेत. फक्त एका महिन्याच्या कालावधीत अभ्यास करून रिंकूने परीक्षेत मिळवलेले यश प्रशंसनीय असल्याची भावना तिच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. रिंकूच्या निकालाची प्रत सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.