|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » 5200 कलाकार विद्यार्थ्यांनी घेतला सवलतीच्या कलागुणांचा लाभ

5200 कलाकार विद्यार्थ्यांनी घेतला सवलतीच्या कलागुणांचा लाभ 

क्रीडाप्रमाणे यंदा कलागुणांनाही सवलतीचे गुण

कोकण बोर्डातर्फे यंदा प्रथमच कलागुणांचा विचार

अभिजित नांदगावकर /रत्नागिरी

दहावीच्या परीक्षेत यावर्षीपासून क्रीडा गुणांप्रमाणे कलागुणांसाठीही वाढीव गुणांची सवलत देण्यात आली. कोकण विभागात यंदा 5200 विद्यार्थ्यांनी कलागुणांसाठीच्या गुणांचा लाभ घेतला. यामध्ये रत्नागिरीमध्ये अशा कलाकार विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला.

कोकण बोर्डातर्फे यंदा विविध कलांसाठी स्वतंत्र 25 वाढीव सवलत गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला. यामध्ये शास्त्राrय कला, लोककला व चित्रकलेचा समावेश आहे. या कलाप्रकारांतील मान्यताप्राप्त संस्थांच्या परीक्षांच्या गुणपत्रकांचा विचार करण्यात आला. प्रत्येक कलेतील स्तरानुसार त्यांना 5, 10, 15 आणि 25 गुण मंडळातर्फे देण्यात आले.

कलागुणांसाठी देण्यात आलेले हे गुणांची अंतिम मर्यादा ही 25 ठेवण्यात आली. कारण काही विद्यार्थी चित्रकला, तसेच संगीत किंवा नृत्यकला अशा दोन दोन कलांत पारंगत आहेत. त्यामुळे या दोन्ही कलांच्या परीक्षांतील गुणांची मर्यादा 25 गुण ठेवण्यात आली. काहीवेळा दोन्ही कलांत अधिक गुण प्राप्त करण्याच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी दिलेल्या असू शकतात. त्यामुळे अंतिम 25 गुणांचा निकष ठेवण्यात आला.

संगीत कलेत तीन परीक्षा पास असलेल्या विद्यार्थ्याला 10 गुण, 5 परिक्षा पास असतील 25 सवलतीचे गुण देण्यात आले. तर ड्रॉईंग इंटरमिजीएटसाठी श्रेणीनुसार 15 गुण, बी श्रेणीला 10, तर सी श्रेणी असेल तर 5 गुण देण्यात आले. संगीतामध्ये ज्याप्रमाणे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना मान्यताप्राप्तचा दर्जा आहे. त्यानुसारच इतर कलांतील अशा मान्यताप्राप्त नामांकित संस्थांच्याच परीक्षा गुणपत्रकांचा सवलतीच्या गुणांसाठी विचार करण्यात आला.

कोकण बोर्डातर्फे यावर्षी प्रथमच अशा सवलतींच्या गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला. याचा कलाकार विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी बहुसंख्येने या सवलतीच्या गुणांचा लाभ घेतला. क्रीडा गुणांप्रमाणे कलागुणांनाही सवलतीच्या गुणांची मागणी गेले काही वर्षे विद्यार्थी व पालकांतून होत होती. त्यानुसार यंदा या मागणीचा विचार बोर्डातर्फे करण्यात आला.

5200 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

कोकण बोर्डात उत्तीर्ण झालेल्या एकूण 38104 विद्यार्थ्यांपैकी 5200 विद्यार्थ्यांनी कलागुणांसाठी दिल्या गेलेल्या सवलती गुणांचा लाभ घेतला. या कलागुणांमध्ये शास्त्राrय कलांतर्गत गायन, वादन, तसेच नृत्य, नाटय़, याचबरोबर लोककला आणि चित्रकला या कलाप्रकारांचा समावेश आहे. रत्नागिरीमधील 3346 कलाकार विद्यार्थ्यांनी, तर सिंधुदुर्ग जिह्यातील 1854 कलाकार विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या गुणांचा लाभ घेतला.

Related posts: