|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लाचखोर नगराध्यक्षांविरोधात मोर्चा

लाचखोर नगराध्यक्षांविरोधात मोर्चा 

प्रतिनिधी/ वाई

लाचखोर नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, नगराध्यक्ष हाय हाय, लाचखोर नगराध्यक्षांचा निषेध असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महागणपती घाटावरून नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. उपनगराध्यक्ष अनील सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, शहर आणि तालुक्मयातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि नगरसेविका यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात महिला पुरूष, नागरिक असे 5000 हून अधिक वाईकर नागरिकांचा समावेश होता. महागणपती घाट, किसनवीर चौक, पार्श्वनाथ चौक, महात्मा फुले मंडईमार्गे हा मोर्चा वाई नगरपालिकेवर नेण्यांत आला. प्रवेश व्दारावर मोर्चेकऱयांच्या वतीने जाहीर सभा घेण्यांत आली.

या सभेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिटणीस प्रतापराव पवार म्हणाले, शुक्रवारी सकाळी वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर शिंदे यांनी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले आणि शहराला मान खाली घालावयास लावणारी घटना घडली. या शहरांत अनेक दिग्गज माणसे घडली, तसेच द्रविड हायस्कूलने असंख्य विद्यार्थी घडविले त्यांच्यावर संस्कार केले. अशा संस्कारक्षम शाळेतील शिक्षक सुधीर शिंदे हे लाच स्विकारताना पकडले जातात त्यांना संस्थेने त्वरित निलंबित करावे आणि लाचखोर नगराध्यक्षांनी त्वरित राजिनामा द्यावा याशिवाय ज्या दोन नगरसेवकांचाही यांत सहभाग असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले त्यांनाही अटक करण्यांत यावी.

उपनगराध्यक्ष अनील सावंत म्हणाले, या लाचखोर नगराध्यक्षांनी त्वरित राजिनामा द्यावा म्हणजे नगरपरिषेदचा कारभार सुरळीत चालण्यास मदत होवून नागरिकांवया सर्व मूलभूत गरजांची पुर्तता होवून सर्व सुविधा उपलब्ध होतील.

नीलिमा सरकाळे यांनी तीव्र शब्दात नगराध्यक्षांचा निषेध करून शहराला काळिमा फासणाऱया या भ्रष्ट नगराध्यक्षांनी राजिनामा द्यावा.

न. पा. गटनेते भारत खामकर यांनी पूर्वीच्या नगराध्यक्षांच्या पारदर्शक कारभाराचा दाखला देत विद्यमान नगराध्यक्षांच्या प्रवृत्तीवर जोरदार हल्ला चढविला अशा लाचखोर नगराध्यक्षांना त्यापदावर राहणाऱया नैतिक अधिकार नाही त्यांनी स्वत: होवून राजिनामा द्यावा.

यावेळी विद्यमान नगराध्यक्षांनी राजिनामा दिला नाही तर वाई बंद चे अवाहन करावे लागले असे यावेळी मोर्चेकऱयांकडून सांगण्यात आले.

वाई ता. पं.स. चे माजी सभापती दिलीप बाबा पिसाळ यांनी मोर्चेकऱयांचे कौतुक करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचाराविरोधात उचललेल्या पावलाला सर्वानी एकजुटने साथ द्यावी असे सांगितले.

मोर्चात सहभागी झाले बद्दल नगरसेवक राजेश गुरव यांनी सर्व मोर्चेकऱयांचे आभार मानले.

यावेळी मोर्चात उपनगराध्यक्ष अनील सावंत नगरसेवक संग्राम पवार, सीता नायकवडी, भारत खामकर स्मिता हगीर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, शितल शिंदे, रेश्मा जायगुडे, विकास काटेकर, राजेश गुरव, प्रियांका डोंगरे, आरती कांबळे, श्रीकांत चव्हाण, दीपक ओसवाल यासह दासबाबू गायकवाड, भूषण गायकवाड, अमर जमदाडे, वामन खरात, प्रदीप जायगुडे, शैलेंद्र देवकुळे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, शशिकांत पिसाळ, मोहन जाधव, भैय्या डोंगरे, मामा- देशमुख, अजित शिंदे, संजय लोळे, प्रमोद शिंदे यासह वाई तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी वाई शहराचे पदाधिकारी अबालवृध्द, महिला युवक युवती पुरूष नागरिक मोठय़ा संख्यने हजर होते.